CSK vs KKR, IPL 2023 Match 61 Live Score Update: चेन्नईने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम गोलंदाजीसाठी केले आमंत्रित

दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 27 वेळा सामना झाला आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने 18 आणि कोलकाता नाईट रायडर्सने केवळ 9 वेळा विजय मिळवला आहे.

CSK vs KKR

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 60 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 27 वेळा सामना झाला आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने 18 आणि कोलकाता नाईट रायडर्सने केवळ 9 वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी या दोघांमधील आजचा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. येथे दोन्ही संघ 9 वेळा भिडले आहेत, ज्यात CSK 7 आणि KKR ने फक्त 2 जिंकले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, नितीश राणा (क), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्ष्णा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now