LSG vs CSK Toss Live Update: चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ मजबूत स्थितीत आहेत. लखनौ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 45 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs LSG) यांच्यात खेळला जात आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ मजबूत स्थितीत आहेत. लखनौ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. गेल्या सामन्यात लखनौ संघाचा आरसीबीकडून 18 धावांनी पराभव झाला होता. चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. सीएसकेनेही 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. चेन्नईला गेल्या दोन सामन्यांत सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, महेश तिक्ष्णा.
लखनौ सुपर जायंट्स : काइल मेयर्स, मनन वोहरा, कर्ण शर्मा, आयुष बडोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), क्रुणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)