CSK vs DC, IPL 2023 Toss Update: चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने 11 सामने खेळले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने 10 सामने खेळले आहेत.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामातील 55 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने 11 सामने खेळले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने 10 सामने खेळले आहेत. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज 6 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स फक्त 4 विजय मिळवून गुणतालिकेत तळाशी म्हणजे 10 व्या स्थानावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश थिकशाना.

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिले रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद, इशांत शर्मा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या