IPL 2023 Match 12, MI vs CSK Live Update: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित
मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात आरसीबीने 8 गडी राखून पराभव केला होता. सीएसके ने दोन सामने खेळले आहेत ज्यात एक जिंकला आणि एकात पराभवाचा सामना करावा लागला.
आज आयपीएल 2023 चा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबईतील वानखेडेवर खेळला जात आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात आरसीबीने 8 गडी राखून पराभव केला होता. सीएसके ने दोन सामने खेळले आहेत ज्यात एक जिंकला आणि एकात पराभवाचा सामना करावा लागला. आजच्या रोमांचक सामन्यात रोहित शर्मा आणि एमएस धोनी आमनेसामने आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ.
चेन्नई सुपर किंग्ज : डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)