Rohit Sharma On Shubman Gill Wicket: कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर नाराजी केली व्यक्त, म्हणाला...
दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धावांनी पराभव करत डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धावांनी पराभव करत डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया उरलेल्या 280 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, पण टीम 63.3 ओव्हरमध्ये 234 रन्सवर गारद झाली. दरम्यान, डब्ल्यूटीसीच्या फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) थर्ड अंपायरच्या निर्णयावर नाराज असल्याचे दिसून आले. रोहित शर्मा म्हणाला की, मी निराश झालो आहे, थर्ड अंपायरने आणखी रिप्ले बघायला हवे होते, निर्णय लवकर घेतला गेला. विशेषत: फिनालेमध्ये अधिक कॅमेरा अँगल असायला हवे होते. आयपीएलमध्ये 10 पेक्षा जास्त आहेत परंतु आयसीसी इव्हेंटमध्ये नाहीत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)