Brendon McCullum आणि Ben Stokes यांच्यात सिक्स हिटिंग चॅलेंज, जाणून घ्या कोणी मारले अधिक षटकार (Watch Video)
अशा परिस्थितीत या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Viral Video: इंग्लंडचा कसोटी संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. जिथे इंग्लिश संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. इंग्लंडचा संघ गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. बेन स्टोक्सची (Ben Stokes) कर्णधारपदी आणि ब्रेंडन मॅक्क्युलमची (Brendon McCullum) प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासून, संघाने अपवादात्मक क्रिकेट खेळले आहे. अशा परिस्थितीत या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये गुरू आणि शिष्य दोघांमध्ये सिक्स मारण्याचे आव्हान होते. सिक्स हिटिंग चॅलेंजमध्ये दोघांनी प्रत्येकी पाच चेंडू खेळले. यामध्ये ब्रेंडन मॅक्क्युलम विजयी झाला. पराभवानंतर बेन स्टोक्स खूपच निराश दिसला आणि त्याने रागाने बॅट फेकली.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)