IND vs NZ ICC World Cup 2023: उपांत्य फेरीत भारतीय सघांचा उत्साह वाढवण्यासाठी बाॅलिवूडच्या कलाकारांनी लावली हजेरी, सर्व आले एकत्र दिसुन
भारतीय सघांचा उत्साह वाढवण्यासाठी बाॅलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली आहे. यादरम्यान, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉन अब्राहम आणि रणबीर कपूर स्टँडमध्ये एकत्र दिसुन आले.
विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) पहिला उपांत्य सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सर्व 9 लीग सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे, तर न्यूझीलंड पुन्हा एकदा टीम इंडियासमोर आपले आव्हान सादर करणार आहे. आजपर्यंत टीम इंडियाला उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात किवी संघाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. पण यावेळी टीम इंडियाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्ट राहिल्याने आज टीम इंडियाला हा विक्रम सुधारून अंतिम फेरी गाठण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. तसेच भारतीय सघांचा उत्साह वाढवण्यासाठी बाॅलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली आहे. यादरम्यान, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉन अब्राहम आणि रणबीर कपूर स्टँडमध्ये एकत्र दिसुन आले. (हे देखील वाचा: Virat Kohli New Record: विराट कोहलीने उपांत्य फेरी सामन्यात नावावर केला नवीन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकले मागे)
.@SidMalhotra with @advani_kiara @TheJohnAbraham and Ranbir Kapoor during India vs New Zealand semi final world Cup match in Mumbai today! 😍💙 #SidharthMalhotra #KiaraAdvani #SidKiara #INDVSNZ #IndiaVsNewZealand #WorldCup2023 pic.twitter.com/RdhIPpfXFq
— Sidharth Malhotra FC (@SidharthFC_) November 15, 2023
Kiara Advani, Siddharth Malhotra, John Abraham and Ranbir Kapoor in the stands. pic.twitter.com/2tM1t5ra0m
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2023 04:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

