Virat Kohli New Record: विराट कोहलीने उपांत्य फेरी सामन्यात नावावर केला नवीन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकले मागे

संघाचा सर्वात मोठा खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) उपांत्य फेरीच्या सामन्यात इतिहास रचला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) भारतासाठी 1996, 2003 आणि 2011 च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळली होती. मात्र आता विराट कोहली सचिनच्या पुढे गेला आहे.

Virat Kohli New Record: विराट कोहलीने उपांत्य फेरी सामन्यात नावावर केला नवीन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकले मागे

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर संघाचा सर्वात मोठा खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) उपांत्य फेरीच्या सामन्यात इतिहास रचला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) भारतासाठी 1996, 2003 आणि 2011 च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळली होती. मात्र आता विराट कोहली सचिनच्या पुढे गेला आहे. विराट कोहली चौथ्यांदा वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. विराटने भारतासाठी 2011, 2015 आणि 2019 मध्ये गेल्या तीन विश्वचषकांमध्ये उपांत्य फेरीचे सामने खेळले होते. आता चार सेमीफायनल खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. (हे देखील वाचा: Shubman Gill Half-Century: भारताची धावसंख्या एका विकेटवर 100 धावा पार, शुभमन गिलचे अर्धशतक)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2023 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).