Afghanistan Beat England: विश्वचषकात मोठा अपसेट, अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी केला पराभव, मुजीब-रशीदची जादू

रविवारी (15 ऑक्टोबर) इंग्लंड आणि अफगाणिस्तान (ENG vs AFG) यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात अफगाणिस्थानने विश्वविजेता इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला.

क्रिकेट विश्वचषक 2023 चा 13 वा (ICC Cricket World Cup 2023) सामना रविवारी (15 ऑक्टोबर) इंग्लंड आणि अफगाणिस्तान (ENG vs AFG) यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात अफगाणिस्थानने विश्वविजेता इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला. हा अफगाणिस्थानचा विश्वचषकातील पहिला विजय आहे. तत्तपुर्वी, इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तान संघाने इंग्लडसमोर 285 धावाचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तानसाठी सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने सर्वाधिक 80 धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 40.3 षटकांत केवळ 215 धावा करून अपयशी ठरला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक 66 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमान यांनी सर्वाधिक तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now