Rashid Khan Captain: अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल, राशिद खानला दुसऱ्यांदा टी-20 संघाचे मिळाले कर्णधारपद

राशिद खानला याआधी अफगाणिस्तानचे कर्णधारपद देण्यात आले होते. राशिद खानला अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्याची ही दुसरी वेळ आहे.

राशिद खान (Photo Credit: Getty)

Afghanistan T20 Captain: राशिद खानला (Rashid Khan) पुन्हा टी-20 फॉरमॅटमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. रशीद खानने अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीची जागा घेतली आहे. राशिद खानला याआधी अफगाणिस्तानचे कर्णधारपद देण्यात आले होते. राशिद खानला अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्याची ही दुसरी वेळ आहे. गुरुवारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की राशिद खान संघाचा पुढील कर्णधार असेल. फेब्रुवारी 2023 मध्ये अफगाणिस्तान आणि युएई यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. कर्णधार म्हणून राशिद खानची ही पहिलीच मालिका असेल.

पहा Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement