IND vs BAN ODI 2022: टीम इंडियाला मोठा धक्का; ऋषभ पंत वनडे मधून बाहेर, अक्षर पटेलही उपस्थित नाही

ढाका येथे मालिकेतील पहिल्या वनडेमध्ये नाणेफेक झाल्यानंतर लगेचच बीसीसीआयने याबाबत अपडेट दिले.

Rishabh Pant (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी होणार नाही. या मालिकेसाठी त्याला संघातून मुक्त करण्यात आले आहे. ढाका येथे मालिकेतील पहिल्या वनडेमध्ये नाणेफेक झाल्यानंतर लगेचच बीसीसीआयने याबाबत अपडेट दिले. बीसीसीआयने ट्विट केले की, 'वैद्यकीय संघाच्या सल्ल्यानंतर ऋषभ पंतला वनडे संघातून मुक्त करण्यात आले आहे. कसोटी मालिकेपूर्वी तो संघात सामील होईल. त्याच्या जागी एकाही खेळाडूचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. पहिल्या वनडेसाठी अक्षर पटेल निवडीसाठी उपलब्ध नव्हता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif