England 2nd Test Team Against Sri Lanka: इंग्लंडला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज मार्क वुड श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर, जोश हलला मिळाली संधी
वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती, त्याला कसोटी सामन्यातील शेवटचा चेंडू टाकता आला नाही.
ENG vs SL Test Series: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती, त्याला कसोटी सामन्यातील शेवटचा चेंडू टाकता आला नाही. मार्क वुडच्या जागी लेस्टरशायरचा वेगवान गोलंदाज जोश हलचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. ओल्ड ट्रॅफर्ड येथे तिसऱ्या दिवशी वुडला दुखापत झाली आणि शेवटच्या दिवशी तो गोलंदाजी करू शकला नाही, नंतर स्कॅनने त्याच्या उजव्या मांडीला ताण आल्याची पुष्टी केली. इंग्लंड संघाने मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा सात विकेट्सने पराभव करून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.
अंतिम दोन कसोटींसाठी इंग्लंड संघ: ऑली पोप (कर्णधार), गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, जोश हल, डॅन लॉरेन्स, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ऑली स्टोन, ख्रिस वोक्स