PAK vs BAN Test Series 2024: पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठा धक्का, दुखापतीमुळे स्टार सलामीवीर बाद

बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला असून त्यांचा स्टार सलामीवीर महमुदुल हसन दुखापतीमुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून पूर्णपणे बाहेर जाऊ शकतो.

Mahmudul Hasan Joy (Photo Credit - X)

Mahmudul Hasan Joy Injured: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 21 ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. याआधी बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला असून त्यांचा स्टार सलामीवीर महमुदुल हसन दुखापतीमुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून पूर्णपणे बाहेर जाऊ शकतो. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. माहितीनुसार, त्याच्या मांडीला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याला तीन आठवडे विश्रांती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement