Babar Azam ला मोठा झटका, कर्णधारपदानंतर आणखी एक मोठी जबाबदारी गेली

या मालिकेपूर्वी बाबर आझमकडून आणखी एक जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. पाकिस्तान संघाने बाबरला सलामीवीरातून काढून टाकले आहे. बराच काळ सलामीवीर म्हणून संघाकडून खेळणाऱ्या बाबर आझम या खेळाडूचे पद काढून घेण्यात आले आहे.

Babar Azam (Photo Credit - Twitter)

PAK vs NZ: पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) त्याच्या खराब कामगिरीमुळे सतत ट्रोल केले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही माजी कर्णधाराच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका होत होती. आता पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी बाबर आझमकडून आणखी एक जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. पाकिस्तान संघाने बाबरला सलामीवीरातून काढून टाकले आहे. बराच काळ सलामीवीर म्हणून संघाकडून खेळणाऱ्या बाबर आझम या खेळाडूचे पद काढून घेण्यात आले आहे. आता बाबर आझम मधल्या फळीत खेळताना दिसणार आहे. आता बाबर आझमच्या जागी सॅम अयुबला सलामी देण्यात येणार असल्याचे पाकिस्तानचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत बाबर आणि रिझवानची सलामीची जोडी तुटली आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 Series: मालिकेच्या एक दिवस आधी अफगाणिस्तानला मोठा धक्का, मॅचविनिंग खेळाडू Rashid Khan मालिकेतुन बाहेर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)