Josh Hazlewood Injured: चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, जोश हेजलवूडला दुखापत; सोडावे लागले मैदान
वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला चौथ्या दिवशी दुखापत झाली, त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. जोश हेझलवूडला सकाळपासूनच त्रास होत होता. त्यानंतर चौथ्या दिवशी हेजलवूडने फक्त एकच षटक टाकले आणि ड्रिंक्स ब्रेक दरम्यान त्याला मैदान सोडावे लागले.
IND vs AUS 3rd Test Day 4 2024: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गाबा येथे खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. त्यानंतर टीम इंडियावर फॉलोऑनचा धोकाही निर्माण झाला आहे. दरम्यान, चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला चौथ्या दिवशी दुखापत झाली, त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. जोश हेझलवूडला सकाळपासूनच त्रास होत होता. त्यानंतर चौथ्या दिवशी हेजलवूडने फक्त एकच षटक टाकले आणि ड्रिंक्स ब्रेक दरम्यान त्याला मैदान सोडावे लागले. रिपोर्टनुसार, हेजलवूडला दुखापत झाल्यानंतर स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे हेजलवूडला पहिल्या सत्रातून बाहेर राहावे लागले. आता पुढील स्कॅनिंगनंतरच हे खेळाडू पुढील सत्रासाठी उपस्थित राहणार की नाही हे कळेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)