RCB vs GT, IPL 2024 52th Match Toss Update: बेंगळुरूने नाणेफेक जिंकली, गुजरात विरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 7 गमावले आहेत. ते पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सची कामगिरीही काही विशेष झाली नाही. गिलच्या नेतृत्वाखालील संघाने 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. ते 8 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत.

GT vs RCB (Photo Credit - X)

RCB vs GT, IPL 2024 52th Match: आयपीएल 2024 चा 52 वा (IPL 2024) सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 7 गमावले आहेत. ते पॉइंट टेबलच्या तळाशी आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सची कामगिरीही काही विशेष झाली नाही. गिलच्या नेतृत्वाखालील संघाने 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. ते 8 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार विशक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement