Bengaluru Beat Hyderabad: बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून केला पराभव, कोहलीने चार वर्षांनंतर आयपीएलमध्ये झळकावले शतक
बंगळुरूने हैदराबाद संघाचा 8 गडी राखून पराभव केला. कोहलीने दमदार शतक झळकावले. आरसीबीच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर कोहलीच्या बॅटमधून 100 धावा निघाल्या. त्याचवेळी फॅफने 71 धावांची शानदार खेळी केली.
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) म्हणजेच आयपीएल मध्ये आज आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात सामना रंगला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात हैदराबाद संघाने 186 धावा केल्या होत्या. म्हणजेच आरसीबीसमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. संघ हे लक्ष्य सहज गाठू शकेल, अशी आशा आरसीबीच्या चाहत्यांना आहे. आणि तेच झालं. फाफ आणि कोहलीने एकहाती सामना जिंकला. हैदराबाद संघाचा 8 गडी राखून पराभव केला. कोहलीने दमदार शतक झळकावले. आरसीबीच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर कोहलीच्या बॅटमधून 100 धावा निघाल्या. त्याचवेळी फॅफने 71 धावांची शानदार खेळी केली. दोघांमध्ये 172 धावांची भागीदारी आहे. आयपीएल 2023 मधील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. या विजयासह आरसीबीच्या आयपीएल प्लेऑफच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्याचवेळी चेन्नई आणि लखनौला आपला शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)