Ben Stokes Retirement: इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
स्टोक्स मंगळवारी त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे.
इंग्लंडचा टेस्ट टीमचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने सोमवारी ही घोषणा केली. स्टोक्स मंगळवारी त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंड तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना डरहममध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर स्टोक्स वनडेला अलविदा करेल. त्याने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली. यानंतर स्टोक्स कसोटी आणि टी-20 सामने खेळत राहणार आहे. यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकातही त्याचा इंग्लंड संघात समावेश होऊ शकतो. स्टोक्स हा कसोटीत इंग्लंडचा कर्णधार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement