England New Test Captain: इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार म्हणून स्टार अष्टपैलू Ben Stokes याची औपचारिक घोषणा, जो रूटचा बनला उत्तराधिकारी
एप्रिलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेत पराभवानंतर जो रूट पदावरून पायउतार झाला होता. स्टोक्सने गेल्या वर्षी मानसिक आरोग्याचा हवाला देत क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती आणि अॅशेस मालिकेसाठी संघात परतण्यापूर्वी बोटावरील दुसर्या ऑपरेशनमधून बरा झाला होता.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (England and Wales Cricket Board) गुरुवारी स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सची (Ben Stokes) इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार (England Test Captain) म्हणून औपचारिक घोषणा केली. कसोटी कर्णधार म्हणून स्टोक्ससमोर पहिले आव्हान जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची मायदेशात होणारी मालिका असेल. उल्लेखनीय म्हणजे, इंग्लंडने त्यांच्या मागील 17 कसोटींपैकी फक्त एक कसोटी जिंकल्यानंतर जो रूट (Joe Root) या महिन्याच्या सुरुवातीला पायउतार झाला. रूटच्या नेतृत्वात इंग्लिश संघाने ऑस्ट्रेलियात 4-0 अॅशेस आणि वेस्ट इंडिजमध्ये 1-0 अशी मालिका गमावली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)