WPL 2023: स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गुजरात जायंट्सला बसला मोठा धक्का, 'हा' अनुभवी खेळाडू संपूर्ण हंगामासाठी पडला बाहेर
मोहीम सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. अनुभवी खेळाडू डिआंड्रा डॉटिन दुखापतीमुळे या संपूर्ण मोसमातून बाहेर आहे.
महिला प्रीमियर लीग (WPL 2023) च्या पहिल्या सत्राची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या ऐतिहासिक लीगचे काउंटडाऊनही सुरू झाले आहे. ही लीग आजपासून म्हणजेच 4 मार्चपासून सुरू होत आहे. पहिल्या सत्रासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. मोहीम सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. अनुभवी खेळाडू डिआंड्रा डॉटिन दुखापतीमुळे या संपूर्ण मोसमातून बाहेर आहे. फ्रेंचायझीने आता तिच्या जागी ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू किम्बर्ली ग्रेथचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने सोशल मीडिया पोस्टवर ही माहिती दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)