BAN vs AFG, Asia Cup 2023 Score Update: बांगलादेशच्या पदरी नाणेफेक, अफगाणिस्तानला प्रथम गोलंदाजीसाठी केले आमंत्रित
पहिल्या सामन्यात बांगलादेशला श्रीलंकेकडून 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.
आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) चौथा सामना आज बांगलादेश आणि अफगाणिस्तान (BAN vs AFG) यांच्यात खेळला जात आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात बांगलादेशला श्रीलंकेकडून 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत बांगलादेशसाठी ही करा किंवा मरो स्पर्धा आहे. (हे देखील वाचा: Spirit Of Cricket: भारत-पाक आशिया चषक सामन्यात शादाब खानने हार्दिक पांड्याला शूलेस बांधण्यास केली मदत)
प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
बांगलादेश: मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम, हसन महमूद.
अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशीद खान, फजलहक फारुकी, मुजीब उर रहमान.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)