BAN vs SA 2nd Test 2024: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी
वेगवान गोलंदाज तस्किन अहमदला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी सय्यद खालिद अहमदला आणण्यात आले आहे. बांगलादेश संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण ते मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहेत आणि ती जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
Bangladesh National Cricket Team vs South Africa National Cricket Team: बांगलादेश क्रिकेट संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिला सामना 7 विकेट्सने हरला होता. या सामन्यासाठी बांगलादेश संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघात मोठा बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज तस्किन अहमदला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी सय्यद खालिद अहमदला आणण्यात आले आहे. बांगलादेश संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण ते मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहेत आणि ती जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
दुसऱ्या कसोटीसाठी बांगलादेश संघ पुढीलप्रमाणे
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक शोराब, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), झाकीर अली, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, हसन महमूद, नाहीद राणा, हसन. मुराद, सय्यद खालिद अहमद.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)