SL vs BNG, Asia Cup 2022: बांगलादेशने श्रीलंकेसमोर ठेवले 184 धावांचे लक्ष्य, अफिफने केल्या सर्वाधिक धावा

अफिफ 39 आणि महमुदुल्ला 27 धावा करून बाद झाले.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 183 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही आणि 19 धावांवर संघाची पहिली विकेट पडली. त्यानंतर मेहदी हसन आणि कर्णधार शकीब यांनी 24 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली. मेहदी 26 चेंडूत 38 धावा करून बाद झाला. मुशफिकर रहीम स्वस्तात बाद झाला. त्याने 5 चेंडूत 4 धावा केल्या. यानंतर शाकिब आणि अफिफ यांच्यात चौथ्या विकेटसाठी 24 धावांची भागीदारी झाली. महमुदुल्लाह आणि अफिफ हुसैन यांनी पाचव्या विकेटसाठी 37 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. अफिफ 39 आणि महमुदुल्ला 27 धावा करून बाद झाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)