Bangalore Beat Delhi: बंगळुरूचा सलग पाचवा विजय, प्लेऑफच्या आशा कायम; दिल्लीचा 47 धावांनी केला पराभव
आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 62 वा (IPL 2024) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. 'करा किंवा मरो' सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव केला. त्याचवेळी, आरसीबी अजूनही शर्यतीत आहे.
DC vs RCB: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 62 वा (IPL 2024) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. 'करा किंवा मरो' सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव केला. त्याचवेळी, आरसीबी अजूनही शर्यतीत आहे. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत नऊ गडी गमावून 187 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून रजत पाटीदारने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमद आणि रसीख दार सलाम यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ 19.1 षटकांत केवळ 140 धावांवरच गारद झाला. दिल्ली कॅपिटल्सकडून कार्यवाहक कर्णधार अक्षर पटेलने सर्वाधिक 57 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून यश दयालने सर्वाधिक तीन बळी घेतले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)