BAN vs PAK T20I: मैदानात शोएब मलिकला भोवला निष्काळजीपणा, बांगलादेशी विकेटकीपरने या अंदाजात दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता (Watch Video)
टी-20 विश्वचषकात जबरदस्त कामगिरीनंतर बांगलादेशमध्ये पोहोचलेल्या पाकिस्तान संघाची शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात अवस्था दयनीय झाली.
पाकिस्तान क्रिकेट टीमने (Pakistan Cricket Team) बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) 5 षटकात 23 धावांवर 3 विकेट गमावल्यावर मैदानात आलेल्या शोएब मलिकने (Shoaib Malik) नाजूक परिस्थितीत निष्काळजीपणा दाखवला, ज्याचा फायदा बांगलादेशने घेतला आणि यष्टिरक्षक नरुल हसनने (Nurul Hasan) त्याला पॅव्हिलियनमध्ये धाडले. मलिकला खातेही उघडता आले नाही आणि संघाच्या अडचणी वाढल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)