Pakistan Squad For 2nd and 3rd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, बाबर आझम आणि नसीम शाहनां बाहेरचा रस्ता
पहिल्या सामन्यातील दारूण पराभवानंतर संघाने माजी कर्णधार बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना संघातून बाहेर काढून सर्वांनाच चकित केले आहे. बाबर कारकिर्दीत प्रथमच फॉर्ममुळे बाहेर आहे.
PAK vs ENG 2nd And 3rd Test Squad: पाकिस्तान क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. पहिल्या सामन्यातील दारूण पराभवानंतर संघाने माजी कर्णधार बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना संघातून बाहेर काढून सर्वांनाच चकित केले आहे. बाबर कारकिर्दीत प्रथमच फॉर्ममुळे बाहेर आहे. यासोबतच अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमदलाही संघातून वगळण्यात आले आहे. पाकिस्तान संघाच्या निवडकर्त्यांनी हसीबुल्लाह, मेहरान मुमताज, कामरान गुलाम आणि मोहम्मद अली या नव्या खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघ: शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसिबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद. रिझवान (विकेटकीपर), नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद महमूद.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)