TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: अजमतुल्ला उमरझाई पंजाब किंग्सकडे, 2.40 कोटींना घेतले विकत
TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.
TATA IPL 2025 Mega Auction Day 2: इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी खेळाडूंचा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरू आहे. या मेगा लिलावाचा आज दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात. ऋषभ पंतने लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व विक्रम मोडले, जिथे लखनौ सुपर जायंट्सने त्याच्यासाठी 27 कोटी रुपयांची बोली लावली. त्यांच्याशिवाय श्रेयस अय्यरवर 26.75 कोटी रुपये, तर व्यंकटेश अय्यरवर 23.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मेगा लिलावासाठी 577 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज संघाने अजमतुल्ला ओमरझाईसाठी बोली लावली. पंजाब किंग्सने अजमतुल्ला उमरझाईला 2.40 कोटींना विकत घेतले. गुजरात टायटन्स संघाने RTM चा पर्याय निवडला नाही.