AUS vs SA, World Cup 2023 Live Score Update: ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत, रबाडाने घेतल्या दोन षटकात दोन विकेट; ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 56/4
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत सात गडी गमावून 311 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 108 धावांची खेळी खेळली.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक 2023 चा 10 वा सामना आज लखनौमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने फक्त एक सामना खेळला आहे. टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला होता. लखनौमध्ये विजयाची नोंद करणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसेल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत सात गडी गमावून 311 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 108 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 50 षटकात 312 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या 56/4 आहे.