AUS vs ENG, Ashes 2021-22: ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी David Warner याचा सल्ला, इंग्लंडने 0-3 ने गमावली आहे मालिका

कांगारू संघाने अ‍ॅशेस मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून मालिका जिंकली आहे. अशा परिस्थितीत पाहुणा इंग्लंड संघाने या मालिकेत आतापर्यंत एकदाही स्पर्धात्मक खेळ केला नाही. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने ब्रिटिशांना सल्ला दिला आहे.

डेविड वॉर्नर आणि जो रूट (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यातील अ‍ॅशेस मालिका (Ashes Series) सध्या डाऊन-अंडर खेळली जात आहे. कांगारू संघाने अ‍ॅशेस मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून मालिका जिंकली आहे. अशा परिस्थितीत पाहुणा इंग्लंड संघाने या मालिकेत आतापर्यंत एकदाही स्पर्धात्मक खेळ केला नाही. त्यामुळे आता मालिकेतील उर्वरित सामने जिंकून लाज वाचवण्याच्या ब्रिटिश संघ प्रयत्नात असेल. फलंदाजांना बराच वेळ धावा करता येत नाहीत. तर गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर ते देखील विकेट घेण्यातही संघर्ष करताना दिसले. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने (David Warner) ब्रिटिशांना सल्ला दिला आहे. (David Warner निवृत्तीच्या तयारीत, 2023 पूर्वी सध्या करायच्या आहेत ‘या’ दोन गोष्टी; निवृत्ती योजनेत Gabba च्या पराभवाचे आले दुखणे समोर)

वॉर्नरने इंग्लिश संघाला सिंथेटिक विकेट्सवर तयारी करण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून ते खेळपट्ट्यांमधील अतिरिक्त उसळीशी जुळवून घेऊ शकतील. ऑस्ट्रेलियाने मंगळवारी मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात एक डाव आणि 14 धावांनी विजय मिळवत इंग्लंडच्या अ‍ॅशेस जिंकण्याच्या आशा धुळीस मिळवल्या. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमधील पहिली कसोटी 9 गडी राखून जिंकली, तर यजमानांनी अ‍ॅडिलेडमध्ये गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या दिवस/रात्र कसोटी सामन्यात 275 धावांनी जोरदार विजय नोंदवला. यादरम्यान फलंदाजीत संघर्ष करणाऱ्या इंग्लंड संघाबाबत वॉर्नर म्हणाला की, त्यांचे फलंदाज उसळीशी जुळवून घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे अपयशी ठरत आहेत. “बाऊंस फलंदाजीच्या दृष्टीकोनातून एक मोठा घटक आहे. इथे ऑस्ट्रेलियात वाढणे आणि या विकेट्सवर खेळणे हे इंग्लंडच्या तुलनेत आमच्यासाठी वेगळे आहे. मी इंग्लंड संघाला कृत्रिम खेळपट्ट्यांवर सराव करण्याचा सल्ला देईन जेणेकरुन त्यांना या अतिरिक्त उसळीचा सामना करता येईल,” त्याने ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेसला सांगितले.

ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर ही रणनीती काम करत नसल्यामुळे पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी शॉर्ट-पिच चेंडू टाकून चूक केली असे वॉर्नरने सांगितले. तो पुढे म्हणाला, “मी कदाचित इंग्लंडला सिंथॉस (सिंथेटिक विकेट) वर जावे आणि (अतिरिक्त) बाऊन्सविरुद्ध सराव करावा असे सुचवेन. तुम्हाला नेहमी तयारीचे मार्ग शोधावे लागतात आणि बाऊन्ससाठी तयारी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इंग्लंडमधील सिंथॉस.” ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना 5 जानेवारीपासून सुरू होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)