AUS vs AFG Test 2021: ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान टेस्ट सामन्यावर संकट, तालिबानचा ‘हा’ मोठा निर्णय आहे कारण
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळली जाणारी एकमेव पुरुष संघाचा कसोटी सामना रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेटवर बंदी घातल्यास नोव्हेंबरची कसोटी रद्द करेल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे म्हटले आहे.
तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून देशातील क्रिकेटचे भविष्य धोक्यात आले आहे.क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) म्हटले की जर तालिबान सरकारने महिलांना क्रिकेट खेळू देत नसल्याचे मीडिया रिपोर्ट्स सत्य असले तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (Afghanistan) दरम्यान कसोटी सामना देखील आयोजित केला जाणार नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)