Asia Cup 2022 IND vs SL: श्रीलंकेची भारतावर 6 गडी राखून मात; टीम इंडिया अंतिम फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 गडी गमावून 173 धावा केल्या
आशिया चषक 2022 च्या सुपर-फोर फेरीतील आणखी एका सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. याआधी पाकिस्तानविरुद्ध पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ मंगळवारी श्रीलंका संघाकडून पराभवाला सामोरे गेला. भारताने 174 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे श्रीलंकेने 1 चेंडू शिल्लक असताना 4 गडी गमावून पूर्ण केले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 गडी गमावून 173 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 19.5 षटकांत 174 धावा करत सामना जिंकला. सुपर-4 फेरीतील टीम इंडियाचा हा सलग दुसरा पराभव आहे. अशाप्रकारे भारतीय संघ आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement