Ashes 2021-22: पहिल्या अॅशेस टेस्ट दरम्यान इंग्लंडची वाढली डोकेदुखी, फिल्डिंग वेळी Ben Stokes याच्या गुडघ्याला दुखापत, वाचा सविस्तर
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या अॅशेस कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड चाहत्यांची डोकेदुखी वाढवणारी माहिती समोर आली आहे. ब्रिटिश अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याला फिल्डिंग करताना दुखापत झाल्याचे समोर आले आहे. स्टोक्सने दिवसाच्या खेळात फक्त 9 षटके टाकली ज्यात पहिल्या सत्रात 5 आणि उर्वरित दिवसात 4 षटकांचा समावेश होता.
इंग्लंडचा (England) अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला (Ben Stokes) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पहिल्या अॅशेस (Ashes) कसोटीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी गब्बा (Gabba) येथे फिल्डिंग करताना दुखापत झाली. 29व्या षटकात सीमारेषेकडे चेंडूचा पाठलाग केल्यावर स्टोक्स अस्वस्थ असल्याचे दिसले. इंग्लंडचे गोलंदाजी प्रशिक्षक जॉन लुईस म्हणाले, “आमचे वैद्यकीय अधिकारी रात्रभर त्याचे मूल्यांकन करतील आणि तो कसा आहे ते पाहतील. त्याशिवाय अन्य खेळाडू ठीक आहेत.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)