SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2 Live Score Update: सनरायझर्स हैदराबादला दुसरा धक्का, बोल्टने राहुल त्रिपाठीचा डाव संपवला

त्यांना अंतिम फेरीत जाण्याची दुसरी संधी मिळाली आहे. आता या सामन्यात राजस्थान किंवा हैदराबाद कोणताही संघ जिंकेल, अंतिम फेरीत केकेआरशी (KKR) सामना होईल.

SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2: आयपीएल 2024 (IPL 2024) क्वालिफायर-2 चा सामना शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने अलीकडेच आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. तर हैदराबादचा संघ क्वालिफायर-1 मध्ये केकेआरकडून हरल्यानंतर येथे पोहोचला आहे. त्यांना अंतिम फेरीत जाण्याची दुसरी संधी मिळाली आहे. आता या सामन्यात राजस्थान किंवा हैदराबाद कोणताही संघ जिंकेल, अंतिम फेरीत केकेआरशी (KKR) सामना होईल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकुन गोलंदांजी निवडली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या हैदराबादला दुसरा धक्का लागला आहे. हैदराबादचा स्कोर 55/2