IND vs SA 1st Test Day 3 Live Score Update: दुसऱ्या डावात भारताला बसला दुसरा धक्का, रोहित शर्मानंतर यशस्वी जैस्वाल बाद

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाच 408 धावा केल्या असुन यासह त्यांनी भारतावर 163 धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये डीन एल्गरने 185 आणि मार्को जॅनसेनने 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. जसप्रीत बुमराहने 4, सिराज 2, प्रसिध, अश्विन, शार्दुलने प्रत्येकी 1 बळी घेतला.

Yashasvi Jaiswal (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावाच 408 धावा केल्या असुन यासह त्यांनी भारतावर 163 धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये डीन एल्गरने 185 आणि मार्को जॅनसेनने 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. जसप्रीत बुमराहने 4, सिराज 2, प्रसिध, अश्विन, शार्दुलने प्रत्येकी 1 बळी घेतला. याआधी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तत्तपुर्वी, टीम इंडियाचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला झटका बसला. कागिसो रबाडाने रोहित शर्माला बाद केले. भारताची धावसंख्या 5-1 (3 Ovs) होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement