Rohit Sharma Most Sixes: सिक्सर किंग! रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक धमाका, सर्वाधिक षटकार मारण्याचा केला विक्रम
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सामना खेळवला जात आहे. 272 धावांचा पाठलाग करताना भारताने वादळी सुरुवात केली आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) नवव्या सामन्यात बुधवारी (11 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सामना खेळवला जात आहे. 272 धावांचा पाठलाग करताना भारताने वादळी सुरुवात केली आहे. या दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने आणखी एक मोठा धमाका केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने आपल्या 473व्या डावात हा विश्वविक्रम केला आहे. इतकेच नाही तर या इनिंगमध्ये भारतीय कर्णधाराने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने आता एकदिवसीय विश्वचषकात आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच, त्यांनी संयुक्तपणे हे सर्वात जलद केले आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 19 व्या डावात हा विक्रम केला होता. आता रोहितने एकदिवसीय विश्वचषकात 19 डावात सर्वात जलद 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. या डावात त्याने शानदार आणि झंझावाती अर्धशतकही झळकावले. त्याने आपले अर्धशतक 30 चेंडूत पूर्ण केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)