RR vs GT, IPL 2024 24th Match Live Score Update: गुजरात टायटन्स संघाला दुसरा मोठा धक्का, मॅथ्यू वेड चार धावा करुन बाद

गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 197 धावांचे लक्ष्य दिले आहे. राजस्थानकडून स्टार फलंदाज रायन परागने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली.

राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

RR vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 च्या 24 व्या (IPL 2024) सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मोसमात राजस्थानने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत त्यांना आज विजयी मुसंडी मारायची आहे. तर गुजरात संघाने पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकले असून तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 197 धावांचे लक्ष्य दिले आहे. राजस्थानकडून स्टार फलंदाज रायन परागने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्मा, रशीद खान आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स संघाला 20 षटकात 197 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्स संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. गुजरातचा स्कोअर 77/2

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement