Honeybee Bitten Ishan Kishan: न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियावर संकटांचा डोंगर, सूर्यकुमारनंतर आता इशान किशनने वाढवले टेन्शन
यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला मधमाशी चावली आहे. इशान नेटमध्ये सराव करत असताना ही घटना घडली. मधमाशी चावल्यानंतर इशानला सराव अर्धवट सोडावा लागला.
IND vs NZ ICC World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023), यजमान टीम इंडियाला 21 व्या सामन्यात धर्मशाला येथे न्यूझीलंडचा (IND vs NZ) सामना करावा लागणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला (Ishan Kishan) मधमाशी चावली आहे. इशान नेटमध्ये सराव करत असताना ही घटना घडली. मधमाशी चावल्यानंतर इशानला सराव अर्धवट सोडावा लागला. याआधी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना, गतिमान फलंदाज सूर्यकुमार यादवचा (SuryaKumar Yadav) चेंडू त्याच्या मनगटावर आदळला. त्यामुळे प्लेइंग 11 चा मोठा प्रश्न कर्णधार रोहित शर्मासमोर उभा राहिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)