Afghanistan New Batting Coach: आशिया चषकापूर्वी अफगाणिस्तानने 'या' भारतीयाची प्रशिक्षकपदी केली नियुक्ती, आपल्याच संघाविरुद्ध बनवणार रणनीती

आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका माजी भारतीय खेळाडूची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या खेळाडूला प्रदीर्घ प्रशिक्षणाचा अनुभव आहे.

Photo Credit - Twitter

आशिया चषकापूर्वी (Asia Cup 2023) अफगाणिस्तान क्रिकेट संघाला (ACB) पाकिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय मालिका खेळायची आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका माजी भारतीय खेळाडूची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या खेळाडूला प्रदीर्घ प्रशिक्षणाचा अनुभव आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मिलाप प्रदीपकुमार मेवाडा (Milap Pradeepkumar Mewada) यांची राष्ट्रीय संघाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीच ते संघात सामील झाले आहे. जुलैमध्ये बांगलादेश दौऱ्यावर ते अफगाणिस्तान संघासोबत होते. त्याचे काम पाहून त्याला पूर्णवेळ कंत्राट देऊ करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)