PCB filed Complaint to the ICC: भारताकडून लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानची रडारड सुरु, आयसीसीकडे केली 'ही' तक्रार
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) तक्रार केली आहे.
महान फलंदाज बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाला (PCB) एकदिवसीय विश्वचषक-2023 च्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून पराभव पत्करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) तक्रार केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अहमदाबाद येथे एकदिवसीय विश्वचषक (ICC World Cup 2023) सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या 'अयोग्य वर्तन'बद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) तक्रार दाखल केली आहे. भारत विरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानला 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानी पत्रकार आणि चाहत्यांना वर्ल्ड कपसाठी व्हिसा न मिळाल्याबद्दल पीसीबीनेही निषेध नोंदवला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)