Harsha Bhogle Suffering From Dengue: शुभमन गिलनंतर प्रसिद्द समालोचक हर्षा भोगले यांना डेंगुची लागण, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला मुकणार

जगातील महान क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांना डेंगुची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "14 तारखेला भारत - पाकिस्तान सामन्याला मुकावे लागल्याने मी निराश झालो आहे.

हर्षा भोगले (Photo Credits: Getty Images)

भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यापूर्वी जगातील महान क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांना डेंगुची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "14 तारखेला भारत - पाकिस्तान सामन्याला मुकावे लागल्याने मी निराश झालो आहे कारण मला डेंग्यू लागण झाला आहे आणि परिणामी अशक्तपणा आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे ते अशक्य होईल. मी 19 तारखेला खेळासाठी वेळेत परत येण्याची आशा करतो." तसेच विश्वचषकापूर्वी भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करावे लागले होते. या काळात त्याने पहिले दोन सामनेही गमावले होते. तो कितपत तंदुरुस्त आहे याबाबत सध्या कोणतीही ठोस माहिती नाही. असे असतानाही तो भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी अहमदाबादला पोहोचला आहे. या सामन्यात तो टीम इंडियासाठी सहभागी होईल अशी अपेक्षा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now