IND vs SA T20 World Cup Final: इंग्लंडला हरवून टीम इंडिया अंतिम लढतीसाठी बार्बाडोसला पोहोचली, व्हिडिओ आला समोर
गुरुवारी टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर आता टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया बार्बाडोसला (Barbados) पोहोचली आहे. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत (T20 World Cup 2024 Final) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA) होणार आहे. हा सामना बार्बाडोस येथे 29 जून रोजी होणार आहे. गुरुवारी टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर आता टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया बार्बाडोसला (Barbados) पोहोचली आहे. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावर दिसले, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर टीम इंडिया तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)