IND vs AFG Final Live Score: अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत, शाहबाजने करीमला केले बाद
भारतीय कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांच्या नजरा सुवर्णपदकावर आहेत. पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games 2023) पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तानशी (IND vs AFG) होत आहे. भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांच्या नजरा सुवर्णपदकावर आहेत. पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागणार आहे. सेमीफायनलमध्ये भारताने बांगलादेशचा तर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान, प्रथम फलंदांजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान सघांची पाचवी विकेट करीमच्या रूपाने पडली. 5 चेंडूत केवळ 1 धावा काढून तो बाद झाला. शाहबाज अहमदने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अफगाणिस्तानने 10.5 षटकात 52 धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानचा स्कोर 70/5
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)