AFG Beat PAK: अफगाणिस्तानचा पाकिस्तावर 8 विकेटने सनसनाटी विजय, विश्वचषकात आणखी एक मोठा अपसेट
पाकिस्तानने दिलेलं 283 धावांचं आव्हान अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सहज पार करत मोठा विजय मिळवला आहे.
विश्वचषकाती आजच्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर 8 विकेट्सने विजय मिळवत सनसनाटी निर्णाण केली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा सपशेल पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेलं 283 धावांचं आव्हान अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी सहज पार करत मोठा विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानकडून रेहमनुलाह गुरबाज (65) इब्राहिम जारदन (87) आणि रेहमत शाह (77*) यांनी अर्धशतकी खेळी केली तर कर्णधार हाशमतुल्लाह शाहिदीचे (48*) चे अर्धशतक थोडक्यात हुकले. अफगाणिस्तानने 49 षटकांत पाकिस्तानचे आव्हान पार केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)