Aaron Finch Retirement VIDEO: आरोन फिंचचे एकदिवसीय क्रिकेटला अलविदा, शेवटच्या सामन्यात किवी खेळाडूंनी दिला विशेष सन्मान

याआधी ऑस्ट्रेलियानेही फिंचचा विशेष कॅप देऊन गौरव केला होता.

Aaron Finch (Photo Credit - Twitter)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) आपल्या शेवटच्या वनडेतही काही अप्रतिम दाखवू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात फिंचने अवघ्या पाच धावा केल्या. त्याला सहाव्या षटकात किवी गोलंदाज टीम साऊदीने त्रिफळाचीत करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. फिंचच्या खेळीसोबतच त्याची वनडे कारकीर्दही संपुष्टात आली. 35 वर्षीय खेळाडूने आधीच जाहीर केले होते की हा सामना त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना असेल आणि त्यानंतर तो फॉर्मेटमधून निवृत्त होईल. फिंचला शेवटच्या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नसली तरी मैदानात उतरताच किवी खेळाडूंनी त्याचा विशेष सन्मान केला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियन फलंदाजीला सुरुवात होण्यापूर्वी एकत्र उभे राहून फिंचचे कौतुक केले. याआधी ऑस्ट्रेलियानेही फिंचचा विशेष कॅप देऊन गौरव केला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)