SL vs BAN Asia Cup 2023 Live Streaming Online: श्रीलंका - बांगलादेशमध्ये होणार चुरशीची लढत, कधी, कुठे पाहणार सामना घ्या जाणून
आजचा दुसरा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर (Pallekele Stadium) होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात नेहमीच काटे की टक्कर पाहायला मिळते आणि अशा स्थितीत दोन्ही संघांना विजय मिळवून विजयी सुरुवात करायची आहे.
आशिया चषकात (Asia Cup 2023) गुरुवारी श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) यांच्यात दुसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांनी पराभव करत विजयाची सलामी दिली आहे. तसेच आजचा दुसरा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियमवर (Pallekele Stadium) होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात नेहमीच काटे की टक्कर पाहायला मिळते आणि अशा स्थितीत दोन्ही संघांना विजय मिळवून विजयी सुरुवात करायची आहे. टीव्हीवर, प्रेक्षकांना वेगवेगळ्या भाषांमधील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर याचा आनंद घेता येईल. तर ओटीटी वर, चाहत्यांना हॉटस्टारवर एशिया कपचे सर्व सामने पाहता येतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)