IND vs AUS 3rd ODI: भारतीय संघाचा नवीन प्रयत्न, रोहित शर्मासोबत वॉशिंग्टन सुंदर आला सलामीला
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज राजकोटमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिले दोन वनडे सामने जिंकून अजेय आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाकडे तिसरी वनडे जिंकून क्लीन स्वीप पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत. तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सही तिसऱ्या वनडेत परतला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वार्नर 56, मार्श 96, स्मिथ 74 आणि मार्नस लॅबुशेनने 72 अश्या दमदार धावा केल्या. तसेत भारताकडून सर्वाधिक बुमराने 3 विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मासोबत वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला आहे.