कुस्तीपटू Bajrang Punia ने World Wrestling Championships 2022 मध्ये जिंकले कांस्यपदक

बजरंगने 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेराचा 11-9 असा पराभव केला.

Bajrang Punia (Photo Credit - Twitter)

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता आणि 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता बजरंग पुनियाने (Bajrang Punia) जागतिक कुस्ती स्पर्धेत (World Wrestling Championships 2022) कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे हे दुसरे पदक होते. याआधी महिला कुस्तीपटू विनेश फोगटने कांस्यपदक जिंकले होते. बजरंगने 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेराचा 11-9 असा पराभव केला. तत्पूर्वी, बजरंगला उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन डायकोमिहलिसने पराभूत केले होते. त्यानंतर बजरंगने रेपेचेजच्या माध्यमातून कांस्यपदकाचा सामना गाठला आणि जिंकला.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement