World's Most Expensive Cow: ब्राझीलमध्ये तब्बल 42 कोटीला विकली गेली Viatina-19 गाय; ठरली जगातील सर्वात महागडी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
दुग्धोत्पादनसह जगभरातील पशुपालन कार्यक्रमांना चालना देण्यासाठी तिचे भ्रूण जगभर निर्यात केले जातात. या नेलोर जातीच्या गायीला भारतात ओंगोल जाती म्हणूनही ओळखले जाते.
ब्राझीलमध्ये 'व्हियाटिना-19’ (Viatina-19) किंवा नेलोर जातीची गाय तब्बल 4.8 लाख डॉलर्स (सुमारे 42 कोटी रुपये) ला विकली गेली आहे. अशाप्रकारे ही गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे. ब्राझीलमधील मिनास गेराईसमध्ये गायीने हा इतिहास रचला. या गायीचे वजन 1,101 किलो आहे, जे कोणत्याही सामान्य गायीच्या दुप्पट आहे. ही गाय केवळ तिच्या किमतीसाठीच प्रसिद्ध नाही तर तिची विशेष शारीरिक रचना तिला जगातील सर्वात अनोखी गाय बनवते. ही गाय सौंदर्याच्या बाबतीतही सर्वोत्तम आहे. तिने 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये आपले नाव नोंदवले आहे आणि 'चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड' स्पर्धेत 'मिस साउथ अमेरिका' हा किताबही जिंकला आहे. दुग्धोत्पादनसह जगभरातील पशुपालन कार्यक्रमांना चालना देण्यासाठी तिचे भ्रूण जगभर निर्यात केले जातात. या नेलोर जातीच्या गायीला भारतात ओंगोल जाती म्हणूनही ओळखले जाते. भारतातील आंध्र प्रदेशातील ओंगोल प्रदेशात जन्मलेल्या या गायी अति उष्णतेचा सामना करण्याच्या त्यांच्या अपवादात्मक क्षमतेसाठी ओळखल्या जातात. साधारण 1800 च्या दशकात ब्राझीलमध्ये ही जात पहिल्यांदा आणण्यात आली. तिच्या प्रभावी स्नायूंच्या बांधणीमुळे आणि उच्च प्रजननक्षमतेमुळे, या गायीने ब्राझीलमध्ये पशुधन उत्पादकता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (हेही वाचा: Tiger And Wild Boar Fall Into Same Well: वाघ आणि रानडुक्कर एकाच विहिरीत पडले; पुढे काय झालं? पहा व्हिडिओ)
World's Most Expensive Cow:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)