Rajasthan Horror: जैसलमेरमध्ये महिलेचे फिल्मी स्टाईलमध्ये अपहरण करून केलं जबरदस्तीने लग्न; DCW चीफ स्वाती मालीवाल यांनी CM अशोक गेहलोत यांना केली हस्तक्षेपाची मागणी, Watch Video
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका भयानक व्हिडिओमध्ये एक पुरुष एका तरुण मुलीशी जबरदस्तीने लग्न करताना दिसत आहे. मालीवाल यांनी राजस्थान सरकारला या प्रकरणी लक्ष घालून त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Rajasthan Horror: राजस्थानचे वाळवंट म्हटला जाणारा जैसलमेर जिल्हा सध्या सध्या एका धक्कादायक घटनेमुळे चांगलाचं चर्चेत आला आहे. 1 जून रोजी शहरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चित्रपटातील एखाद्या सीनपेक्षा कमी नाही. एक तरुण एका मुलीला उचलून घेऊन जळत्या गवताभोवती फिरत आहे. एक महिला त्याला असे करण्यापासून थांबवताना दिसते, परंतु मुलगा सर्व फेऱ्या मारून मुलीला सोडून जातो. या घडामोडीनंतर पोलिसांनी कारवाई करून मुख्य आरोपीला अटक केली, तर उर्वरित आरोपी फरार आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका भयानक व्हिडिओमध्ये एक पुरुष एका तरुण मुलीशी जबरदस्तीने लग्न करताना दिसत आहे. मालीवाल यांनी राजस्थान सरकारला या प्रकरणी लक्ष घालून त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा - UP Shocker: छेडछाडीला विरोध केल्याने पीडितेच्या घरावर गोळीबार; घटना CCTV मध्ये कैद, Watch Video)
मीडिया द्वारा ये वीडियो जैसलमेर का बताया जा रहा है। रिपोर्ट्स के अनुसार एक लड़की को सरेआम किडनैप करके एक बंजर वीराने में आग जलाकर उसके साथ ज़बरदस्ती शादी कर ली। ये बेहद चौंकाने वाली और डराने वाली घटना है। @AshokGehlot51 जी मामले की जाँच कर कार्यवाही करें। pic.twitter.com/mZee4oJgSy
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) June 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2023 04:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

