Wife Attacks Sex Worker: मसाज पार्लरमध्ये पतीची चालू होती प्रणयक्रीडा; पत्नीने रंगेहात पकडले, सेक्स वर्करला मारहाण (Watch Video)

पतीच्या फोनमध्ये या सेक्स वर्करचे फोटो आढळल्यानंतर पत्नीला आपल्या पतीवर संशय आला होता व याची कल्पना पतीलाही होती.

प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

पतीच्या बाहेरख्यालीपणाशी निगडीत एक धक्कादायक प्रकरण थायलंडच्या फुकेत येथून समोर आले आहे. या ठिकाणी एक महिला आपल्या पतीचा पाठलाग करत मसाज पार्लरपर्यंत पोहोचली, जिथे हा पती सेक्स वर्करसोबत प्रणयक्रीडा करण्यासाठी आला होता. संतापलेल्या पत्नीने एका नग्न सेक्स वर्करवर हल्ला केला आहे. तिने महिलेला एवढी मारहाण केली की, सेक्स वर्करला मदतीसाठी पोलिसांना बोलवावे लागले. पोलीस आल्यानंतर तिला सोडून देण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु अजूनही पिडीत सेक्स वर्करने याबाबत तक्रार दाखल केली नाही.

ही घटना नेमकी कुठे घडली याबाबत जास्त माहिती मिळू शकली नाही. 25 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. पतीच्या फोनमध्ये या सेक्स वर्करचे फोटो आढळल्यानंतर पत्नीला आपल्या पतीवर संशय आला होता व याची कल्पना पतीलाही होती. त्यामुळेच तो पत्नी मसाज पार्लरमध्ये पोहोचण्याआधीच तिथून निघून गेला होता.

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement